राजर्षी शाहू महाराज निबंध भाषण 2023 | Rajarshi Shahu Maharaj Essay speech 2023
नमस्कार आज आपण राजर्षी शाहू महाराज यांचा जीवन क्रम , समाज कार्य ,व राजर्षी शाहू महाराज यांनी केले विविध कायदे ,शैक्षणिक सुधारणा तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी निबंध व भाषण कसे लिहायचे ते पाहणार आहोत.
राजर्षी शाहू महाराजांचा विस्तृत जीवनक्रम खालीलप्रमाणे
● जन्म: २६ जून १८७४ (कागलच्या घाटगे घराण्यात)
जन्मस्थळ : laxmi Vilas p kasba Bavada kagal wadi लक्ष्मीविलास पॅलेस, कसबा बावडा (कागलवाडी), कोल्हापूर. (संदर्भ : दै. सकाळ, २० एप्रिल २०१३) • मूळ नाव : यशवंतराव • पित्याचे नाव : जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे ■ आईचे नाव : श्रीमंत राधाबाईसाहेब
• दत्तक विधान: १७ मार्च १८८४ Kolhapur Raje (कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत आनंदीबाईसाहेब यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव यांस दत्तक घेऊन त्यांचे नाव राजर्षी शाहू महाराज असे ठेवले.) • शिक्षण: १८८५ ते १८८९ : या काळात Rajkot राजकोट येथील राजपुत्रांसाठीच्या महाविद्यालयात शिक्षण..
• principal Macnotan प्रिन्सिपल मॅकनॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली राजांनी Rajkot राजकोट येथील शिक्षण पूर्ण केले.
• मार्च १८८६ : राजांना pirtu viyog पितृवियोग सहन करावा लागला. (जन्मदात्रीचे निधन राजांच्या बालपणीच झाले होते.)
• १८९० ते १८९४ : Maharaj Dharwad महाराजांनी धारवाड येथे सर एस. एम. फ्रेजर Frecher
विवाह Marriage : १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याचे Gunajipant गुणाजीपंत खानविलकर यांची कन्या श्रीमंत laxmi bai लक्ष्मीबाई साहेब यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह.
• राज्याभिषेक : २ एप्रिल १८९४ रोजी वयाच्या २० व्या वर्षी राजे कोल्हापूर संस्थानाचे कायदेशीर वारसदार बनले.
राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक समारंभ मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.
राजर्षी शाहू महाराजांनी केलेले विविध कायदे :
१८९४ : पासूनच वेठबिगाराची पद्धती बंद करून राजांनी अब्राह्मणांना संस्थानात नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
१९१६ कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे आदेश (प्रत्यक्ष अंमलबजावणी १९९९ पासून)
वेदोक्त प्रकरण १८९९ ते १९०१ या काळात राजांच्या जीवनाला कलाटणी देणारे वेदोक्त प्रकरण घडले वेदोक्त प्रकरण महाराजांचा पुरोहीत नारायण भटजी पूजाअर्चेच्या वेळी वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असे. वेदोक्त प्रकरणामुळे महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीस प्राधान्य दिले.
१९०१ : वैदिक वाङ्मय प्रवीण अशा नारायण भट्ट सेवेकरी या ब्राह्मणाकडून महाराजांनी वेदोक्त श्रावणी करून घेतली १९०१ : या वर्षीच महाराजांनी आप्पासाहेब राजोपाध्ये यांना वेदोक्त विधीसाठी निमंत्रित केले असता त्यांनी नकार दिला .
१९०५ : मध्ये महाराजांनी राजोपाध्ये यांचे सर्व वंशपरंपरागत हक्क काढून घेऊन त्यांचे इनाम जप्त केले.
१९१२ : ब्राह्मणेत्तरांची पहिली श्रावणी वेदोक्त पद्धतीने मराठा पुरोहिताने केली.
ऑक्टोबर १९२० : महाराजांनी कोल्हापुरातील शंकराचार्यांचे पीठ रद्द करून क्षात्रजगद्गुरुचे नवे पीठ निर्माण केले.
शैक्षणिक सुधारणा :
संस्थानातील शैक्षणिक क्षेत्रावर महाराज दरवर्षी सुमारे एक लाख रुपये खर्च करीत ११ जानेवारी १९१९ : कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली.
सत्यशोधक समाज कोल्हापूरचे अध्यक्ष परशुराम घोसरवाडकर-इनामदार. (संदर्भ : राज्यसेवा मुख्य पेपर १. दि. २५/०९/२०१६) सत्यशोधक समाज कोल्हापूरचे प्रमुख : भास्करराव जाधव
१९१९ : संस्थानात १५ टक्के विद्यार्थ्यांना नादारींची घोषणा. १९१३ : kolhapur कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा सुरू.
२५ जुलै १९९७ : च्या वटहुकूमाने संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले.
सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा संस्थानात chipripeta चिपरीपेटा येथे सुरू केली.
१९१८ ला Rajaram college (राजाराम कॉलेज ,कोल्हापूर) आर्य समाजाकडे हस्तांतरीत केले.लष्करी शिक्षणासाठी संस्थानात इन्फंट्री स्कूलची स्थापना केली.
१९१२ पाटील शाळांची स्थापना.
१९९८ संस्थानात तलाठी शाळांची स्थापना.
२५ जून १९१८ : संस्थानातील पारंपरिक kulkarni vetan कुळकर्णी वतने बंद करून त्या जागी payment(पगारी )तलाठ्यांची नेमणूक. तलाठी शाळांची स्थापना.
• २९ जुलै १९९८ : तलाठी (Talathi ) हे पद कायमस्वरूपी केले.
महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा महाराजांवर प्रभाव होता.
विविध जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेली वसतीगृहे :
१८९६ ते १९२१ या काळात राजांनी कोल्हापुरात सर्व जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी सुमार २० वसतीगृहे स्थापन केली. यापैकी प्रमुख वसतीगृहे पुढीलप्रमाणे: राजाराम होस्टेल (१९०१); मराठा बोर्डिंग (१९०१); वीरशैव लिंगायत बोर्डिंग (१९०६); मुस्लीम बोर्डिंग (१९०६); मिस क्लार्क होस्टेल (१९०८); दैवज्ञ बौर्डिंग (१९०८); नामदेव बोर्डिंग (१९१९); सरस्वतीबाई गौड सारस्वत बोर्डिंग (१९१५/// ग्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग (१९२०). व्हिक्टोरिया
१९०१ मध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या व्हिक्टोरिया वसतीगृहात अस्पृश्य व मुस्लिम विद्यार्थ्यांची सोय केली.
कोल्हापूर व्यतिरिक्त पुणे, नाशिक, अहमदनगर या ठिकाणीदेखील वसतीगृहे स्थापन केली.
राजर्षी शाहू महाराज माहिती यांचे निर्मुलन कार्य : २६ जुलै १९०२ : शाहू महाराजांनी कोल्हापूर
संस्थानात मागासवर्गीयांसाठी नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवल्या. (२६ जुलै २००२ रोजी कोल्हापुरात मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणाची शताब्दी श्रीमती मायावती यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.) गंगाराम कांबळे यांना 'हॉटेल सत्यशोधक' ('सत्यमुधारक') हे चहाचे दुकान उघडून दिले.
कोल्हापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी मागासवर्गीय उमेदवारास संधी दिली.
१९९८ साली कोल्हापूर संस्थानातील महार वतने रद्द करून त्या जमिनी अस्पृश्य बांधवांच्या नावे केल्या.. २२ फेब्रुवारी १९१८ : कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये जाहिरनामा प्रसिद्ध करून संस्थानातील बलुतेदारी पद्धती कायद्याने बंद केली आणि बलुतेदारांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले.
१५ जानेवारी १९९९ : राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात 'आजपासून सार्वजनिक जागी व सार्वजनिक संस्थांमध्ये अस्पृश्यता पाळली जाणार नाही' असा आदेश काढला.
राजर्षी शाहू महाराजांनी महिलांसाठी केलेल्या सुधारणा : जुलै १९१७ पुनर्विवाह व विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत..
फेब्रुवारी १९९८ आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत.
१९१९ स्त्रियांना क्रुरपणे वागविण्यास (शारीरिक व मानसिक छळ) प्रतिबंध करणारा कायदा संमत. १९२० : संस्थानात घटस्फोटाचा कायदा संमत केला.
राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या औद्योगिक व कृषी सुधारणा :
१८९५ : शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ स्थापन केली.
सप्टेंबर १९०६ : कोल्हापूर येथे शाहू मिलची स्थापना. (महाराष्ट्र शासनाने २००३ मध्ये शाहू मिल बंद केली. उद्योगांना चालना देताना संस्थानातील गडहिंग्लज व शिरोळ या गावातून जिनिंग फॅक्टरी सुरू केली.
शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी बलभीम को-ऑपरेटीव्ह व अर्बन को-ऑपरेटिव्ह या सहकारी सोसायट्यांची स्थापना. १९०८ मध्ये राजांनी भोगावती नदीवर धरण बांधून तेथे राधानगरी हे गाव वसविले.
धरणाच्या जलाशयाचे नाव : महाराणी लक्ष्मीबाई तलाव.
१९१३ : कोल्हापूर संस्थानात सहकारी संस्थांचा कायदा करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
१९१६ : बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. राजर्षी शाहू महाराज उपस्थित राहिलेल्या सभा : १९१७ च्या खामगाव मराठा परिषदेचे अध्यक्षपद राजांनी भूषविले.
१९१८ च्या मुंबई येथील पिपल्स युनियन सभेचे अध्यक्षस्थान राजांनी भूषविले.
२१ एप्रिल १९१९ : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे भरलेल्या १३ व्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेचे अध्यक्षपद शाहू राजांनी भूषविले. या सभेत राजांच्या भाषणाने प्रभावित होऊन कानपूरच्या जनतेने त्यांना 'राजर्षी' ही पदवी दिली.
२२ मार्च १९२० : कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन संपन्न झाले.
राजर्षी शाहू महाराजांची प्रसिद्ध वचने :
'माझी सर्व प्रजा मराठी तिसरी इयत्ता जरी शिकून तयार झाली असती तरी तिच्या हाती राज्य कारभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असती.
'फासेपारध्यांना माणसासारखे जगू दया."
राजर्षी शाहू महाराजांबद्दलचे गौरवोद्गार (उपाध्या) : माणसातील राजा आणि राजातील माणसू. • 'लोकांचा राजा. (लोकराजा) जून १९०२ मध्ये केंब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांना एल. एल. डी. (L.L.D.) ही पदवी दिली.
‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष' या शब्दात महर्षि वि. रा. शिंदे यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला. "He was a king but a Democratic king" या शब्दात भाई माधवराव बागल यांनी राजांच्या कार्याचा गौरव केला.
राहूल सोलापूरकर यांनी 'राजर्षी शाहू महाराज' या दूरदर्शन मालिकेत राजांची भूमिका साकारली आहे. राजर्षी शाहू महाराजांचे अनुयायी : केशवराव ठाकरे, भास्करराव जाधव, केशव विचारे, दिनमित्रकार मुकुंदराव थिऑसॉफिकल सोसायटीच्या विचारांचा राजांवर पगडा होता.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा महाराजांवर विशेष प्रभाव होता.
अन्य सुधारणा कार्ये :
कोल्हापूर येथे ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी 'श्री शिवाजी वैदिक स्कूल ची स्थापना.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'मुकनायक' व आगरकरांच्या 'सुधारक' या वृत्तपत्रांना राजांनी आर्थिक सहाय्य केले,
लोकसंघ या मुंबई येथील कामगार संघटनेस सहाय्य केले. व्हॅलेटीन चिरोलच्या 'Unrest In India' या ग्रंथाचे मराठीत भाषांतर राजांनी रा. र. डोंगरे यांच्याकडून करवून घेतले.
पन्हाळा येथे चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडीचे प्रयोग केले. • 'साठमारी' हा हत्तींचा खेळ कोल्हापुरात सुरू केला.
• कोल्हापुरात छत्रपती मेळाव्याची स्थापना केली. • १८९५ मोतीबाग तालमीची स्थापना.
२१ एप्रिल १८९१ : लॉर्ड हॅरिस यांच्या उपस्थितीत कोल्हापूर ते मिरज रेल्वे शुभारंभ.
१९१२ रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना. कोल्हापूर ही 'मल्लविद्येची पंढरी' बनविली. १९१८ : कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा स्थापना केली. मे १९०२: सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणास लंडन येथे राजांनी हजेरी लावली.