महात्मा ज्योतिबा फुले माहिती | Mahatma Jyotiba Phule Information

एकोणिसाव्या(१९)शतकात अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी महात्मा फुले यांनी केली. या मुक्तिसंग्रामाचे मूळ स्त्रोत जोतिरावांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातच आढळतात.

तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी महात्मा फुले यांचा गौरव करताना म्हणतात . बहुजन समाजात आत्म प्रत्यय व आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले.

महात्मा ज्योतिबा फुले माहिती | Mahatma Jyotiba Phule Information

महात्मा ज्योतिबा फुले - जीवन परिचय Mahatma Jyotiba Phule Information

जन्म : ११ एप्रिल १८२७( पुणे.)

 मुळगाव:  कटगुण (जिल्हा सातारा.)

मूळ आडनाव : गोऱ्हे.( जोतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत त्यामुळे  गोऱ्हे आडनाव मागे पडून ते फुले बनले)

माता (आई ) : मणाबाई .

 पिता (वडील ) :  गोविंदराव .

 जोतिबांचे आजोबा :  शेटिबा.

समाज : महात्मा ज्योतिबा फुले क्षत्रिय माळी समाजातील होते.

शिक्षण : पंतोजीच्या शाळेत जोतिबांचे प्राथमिक शिक्षण झाले .(१८३३ ते १८३८ ).

उर्दू शिक्षक गफार बॅग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिट साहेब यांच्या प्रयत्नाने पुण्यातील स्कॉटिश मिशनरी शाळेत जोतिबांचे इंग्रजी शिक्षण झाले.( १८४१ ते १८४७).

विवाह : १८४० वयाच्या तेराव्या वर्षी धनकवडी च्या खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंची विवाह झाला.

महात्मा फुले यांचे महिला उद्धाराचे कार्य.

 स्त्री शिक्षण -

जोतिबांनी समाजकार्य सुरुवात करताना सर्वप्रथम स्त्री शिक्षणास प्राधान्य दिले.

१८४८ पुण्यातील बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.

३( तीन )जुलै १८५१ ( अठराशे एक्कावान) बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरु केली .

१७ सप्टेंबर १८५१ रस्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरु केली.

१५ मार्च १८५२ वेताळ पेठेत मुलींची शाळा सुरू केली मुलींसाठी शाळा सुरू करण्या च्या  जोतिबांच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरार या बाईंनी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेची प्रेरणा होती.

स्त्री शिक्षणा विषयी महत्त्व सांगताना “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी ” असे महात्मा फुले म्हणतात.

 १६ नोव्हेंबर १८५२ जोतिबांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे मेजर कॅंडी च्या हस्ते त्यांचा सत्कार केला.

विधवा पुनर्विवाह

 १८६४ पुण्यातील गोखल्यांच्या बागेत फुल्यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

१८६५ : विधवांच्या केशवपनाची बंदी साठी प्रयत्न करताना तळेगाव ढमढेरे येथील नाभिक बांधवांचा संप घडवून आणला.

बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना

  बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना १८६३ -  चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांंची आपत्तीतून सुटका करण्यासाठी जोतिबांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.

महात्मा फुले यांचे अस्पृश्यतानिर्मूलन कार्य :

 महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी संपूर्ण समाज व्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे हा विचार सर्वप्रथम मांडला.

१८५१ अस्पृश्यांच्या मुलांसाठी नाना पेठेत पहिली शाळा सुरू, ती बंद पडली.. 

१८५२ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरू केली.

१८५८ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी तिसरी शाळा सुरू. 

१८७३ : महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

सत्यशोधक समाजाची स्थापना: २४ सप्टेंबर १८७३.

शुद्रातिशुद्रांची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांची धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने

महात्मा फुलेंनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

 Public Truth and Slavery   ("सार्वजनिक सत्यधर्म' व 'गुलामगिरी' )या ग्रंथांत जोतिबांनी सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांबद्दल विवेचन केले आहे. 

सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य - 

" सर्वसाक्षी जगत्पती । त्यासी नकोच मध्यस्थी ||

सत्यशोधक समाज ही समाजसुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ आहे.  

डिसेंबर १८७३ : मध्ये सिताराम आल्हाट व राधाबाई निंबकर या जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावला.

सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष : नारायण मेघाजी लोखंडे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक : नारायणराव कडलक

सत्यशोधक समाजाची अधिवेशने: १८७३ साली स्थापना झाली तरी सत्यशोधक समाजाची अधिवेशने १९९१ पासून सुरू झाली.

पहिले अधिवेशन : १७ एप्रिल १९११, पुणे. •

स्वागताध्यक्ष : गणपतराव बिरमल.

महात्मा फुलेंचे कार्य :

अध्यक्ष : स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू

शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याविषयी जोतिबांनी सरकारला पुढील सूचना केल्या होत्या.

 १) तलाव, बंधारे, धरणे बांधून शेतीला योग्य पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा.

२) पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने मिळावेत. 

३) कालव्याचे पाणी वेळेवर मिळावे. 

४) पशुपालनासाठी चालना द्यावी.

५) सुधारित शेतीसाठी सुधारित अवजारे, अल्पव्याजी कर्जे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी. 

१८७७ च्या दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळ पीडीत विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली.

१८८८ मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट भारताच्या भेटीवर आले असता जोतिरावांनी पारंपरिक शेतकऱ्याच्या वेषात त्यांची पुणे येथे भेट घेऊन भारतीय शेतकऱ्यांच्या हालाखीचे दर्शन घडविले.

जुन्नर (पुणे) येथील शेतकऱ्यांचा सावकारशाहीविरुद्धचा लढा जोतिबांनी यशस्वी केला. 

१८७६-७७ च्या दुष्काळात पुणे व अहमदनगर जिल्ह्यांत जोतिबांच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी खतफोडीचे बंड यशस्वी केले.

शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात शिक्षणाअभावी समाजाची कशी परवड होते ते सांगितले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जोतिबा हे महाराष्ट्रातील पहिले कर्ते सुधारक होते.

महात्मा फुलेंचे शिक्षणविषयक विचार :

१८८२ साली भारतातील शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आले होते. जोतिबा फुलेंनी हंटर कमिशन समोर साक्ष देताना पुढील विचार मांडले

१) सरकार शेतकऱ्यांकडून जो सारा वसूल करते, त्यातील उत्पन्न कनिष्ठांच्या (शेतकरी वर्गाच्या) शिक्षणावर खर्च केले पाहिजे. 

२) १२ वर्षांखालील मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे.

३) प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील व प्रशिक्षित असावेत.

 महात्मा फुलेंचे धर्मविषयक विचार 

जोतिबा कट्टर एकेश्वरवादी होते व ईश्वराचे अस्तित्व मानणारे होते...

जोतिबांनी ईश्वराला निर्मिक असे संबोधले आहे.

 समतेवर आधारलेल्या मानवधर्माचा जोतिबांनी पुरस्कार केला.

महात्मा फुले यांची साहित्य संपदा 

तृतीय रत्न
छत्रपती शिवाजीराजे
भोसले यांचा पवाडा
पवाडा : विद्याखात्यातील 
ब्राह्मण पंतोजी
ब्राह्मणांचे कसब
गुलामगिरी
शेतकऱ्यांचे असुड
सत्सार
इशारा
ग्रामजोश्यांसबंधी जाहीर खबर
मामा परमानंद यांस पत्र
सार्वजनिक सत्य धर्म

अस्पृश्यांची कैफियत, खतफोडीचे बंड, सत्यशोधक समाज हे ग्रंथदेखील जोतिबांनी लिहिले.

 अभंगांच्या धर्तीवर त्यांनी 'अखंड' रचले. (अखंडादी काव्यरचना) जोतिबांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला 'सार्वजनिक सत्यधर्म' हा शेवटचा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाणग्रंथ मानला जातो.

पक्षाघातामुळे अंग लुळे पडल्याने जोतिबांनी 'सार्वजनिक सत्यधर्म' हा ग्रंथ काही काळ डाव्या हाताने लिहिला. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार या ग्रंथांमधून जोतिबांनी बहुजन समाजावर लादली गेलेली मानसिक गुलामगिरी निदर्शनास आणली.

 महात्मा फुलेंचे राजकीय विचार :

इंग्रजांच्या सामाजिक, शैक्षणिक सुधारणाधोरणामुळे जोतिबांना त्यांच्याबद्दल सहानुभूती होती मात्र शासन सत्ता समाजाच्या

उन्नतीच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या हितसंबंधांच्या आड येईल असे वाटले त्या त्या वेळी त्यांनी सरकारवर टीकादेखील केली. १८८९ च्या राष्ट्रीय सभेच्या मुंबई येथील अधिवेशनात जोतिबांनी 'जोपर्यंत शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेतसामावून घेतले जात नाही तोपर्यंत राष्ट्रीय म्हणवून घेण्याचा अधिकार सभेस पोहोचत नाही' असे परखड विचार मांडले.

आठ वर्षांच्या आतील मुलांना कामावर घेण्यात येऊ नये असे निवेदन जोतिबांनी सरकारला सादर केले.

 महात्मा फुले यांच्यावर प्रभाव : 

जोतिबांवर थॉमस पेन यांच्या 'राईटस ऑफ मॅन' व 'कॉमन सेन्स' या ग्रंथांचा विशेष प्रभाव होता. शालेय जीवनात जोतिबांवर छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्रांचा प्रभाव पडला. जोतिबांचे सहकारी : सदाशिव बल्लाळ गावंडे, सखाराम परांजपे, लोखंडे, केशवराव भवाळकर, वाळवेकर इत्यादी.

नगरसेवक : १८७६ ते १८८२ या काळात फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. नगरसेवक असताना फुलेंनी पुणे मार्केटची इमारत बांधण्यास व लॉर्ड रिपनला मानपत्र देण्यास विरोध दर्शविला

व त्यावरील खर्च शिक्षणासाठी वापरावा, अशी शिफारस केली. समाजातील व्यसनाधिनता दूर करण्यासाठी फुल्यांनी पुण्यातील दारूच्या गुत्त्यांना परवाना देण्यास विरोध केला.

१८७५ : न्या. रानडे यांनी पुण्यात स्वामी दयानंद सरस्वतींची हत्तीवरून मिरवणूक काढली, त्यावेळी जोतिबांनी न्या. रानडे यांना सहकार्य केले.

शिवजयंती सुरुवात : १८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला. 

रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज जोतिबांनी केला होता.

१८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली 'शिवजयंती' साजरी केली. त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी १८९५ पासून शिवजयंती उत्सवास राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले.

१८७७ : दीनबंधू हे वृत्तपत्र जोतिबांच्या आशिर्वादाने चालू झाले. संपादक : कृष्णराव भालेकर. 

 जोतिबांना जीवे मारण्यासाठी पाठविण्यात आलेले रोडे व कुंभार हे रामोशी बांधव जोतिबांना शरण आले.

जोतिबांच्या कार्यात त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांनी त्यांना सावलीप्रमाणे साथ दिली.

टिळक व आगरकर यांची डोंगरी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर महात्मा फुलेंनी या द्वयींचा मुंबई येथे  पंडिता रमाबाई यांना धर्मांतरापासून रोखण्याचा प्रयत्न महात्मा फुले यांनी केला.
सत्कार केला.

जोतिबांबद्दलचे गौरवोद्गार : 

'समाजक्रांतिकारक • "खऱ्या लोकशिक्षणाचा शिल्पकार'

. ११ मे १८८८ : मुंबईच्या जनतेच्या वतीने रावबहाद्दूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी जोतिबांना महात्मा ही पदवी दिली. 

 डॉ. धनंजय किर फुलेंविषयी म्हणतात, "जोतिबा फुले या माळ्याने राष्ट्ररूपी

बागेतील सामाजिक एकतेच्या

महात्मा गांधी फुलेंविषयी म्हणतात, 'जोतिबा हे खरे महात्मा होते.  ग्रामची या तत्त्ववेत्याने जोतिबांना 'सेंद्रीय बुद्धीवंत' असे संबोधले.

बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना हिंदूस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन असे संबोधले आहे.

डॉ. धनंजय किर यांनी जोतिबांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे संबोधले आहे.  

जोतिबा फुलेंचे निधन : 

२८ नोव्हेंबर १८९०. जोतिबांनी मृत्यूपत्रात आपले दहन न करता परसदारी मिठात घालून पुरण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. 
 जोतिबा हे उक्ती आणि कृती यामध्ये एकवाक्यता साधणारे सुधारक होते.

स्त्री-पुरुष समानता, जातीभेदास विरोध, स्वातंत्र्य, समता व बंधूता यांचे महत्त्व पटवून मानवाचे स्वत्व जागविणारे जोतिबा हे भारतीय समाजक्रांतीचे जनक होते.
























टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.