डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Dr. Babasaheb Ambedkar
इतिहासकार धनंजय कीर डॉ. बाबासाहेब आंबेडकराबद्दल म्हणतात, 'या युगातील श्रेणीतील अलौकिक पुरुषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान आहे.
जन्म: १४ एप्रिल, १८९१, मध्य प्रदेशातील इंदूरजवळील महू येथे • मूळ गाव: आंबडवे (जि. रत्नागिरी)
डॉ. बाबासाहेबांचे वडील लष्करात सुभेदार पदावर काम करत होते. त्या दरम्यान बाबासाहेबांचा जन्म महू येथे झाला.
मूळ नाव : भीमराव रामजी सकपाळ ऊर्फ आंबावडेकर.
आईचे नाव : भीमाबाई (Bhimai)होते.
शिक्षण :
प्राथमिक शिक्षणासाठी काही काळ दापोली Dapoli व त्यानंतर satara Agri school साताऱ्यातील अॅग्रीकल्चर स्कूल (एलिमेंटरी स्कूल/प्रतापसिंह स्कूल) मध्ये प्रवेश.
या शाळेतील krishnaji k Ambekar ( कृष्णाजी केशव आंबेडकर) या प्रेमळ गुरुजींनी बाबासाहेबांना आपले 'आंबेडकर' हे आडनाव स्वीकारण्यास सांगितले.
१९०५ : रमाबाई यांच्याशी विवाह.
१९०७ : Mumbai Elp school( मुंबईच्या एल्फिन्सटन हायस्कूल ) मधून मॅट्रिक ( ssc )परिक्षा उत्तीर्ण.
१९१२ : अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन बाबासाहेब एल्फिन्सटन कॉलेजमधून बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण.
उच्च शिक्षण:
जुलै १९१६ या काळात बाबासाहेबांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. M.A. पदवी, १९१५ : Administration & Finance of East India Company हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला व एम. ए. ची पदवी संपादन केली.
Ph.D. पदवी, १९१६ : कोलंबिया विद्यापीठाची पीएच. डी. मिळविण्यासाठी बाबासाहेबांनी 'National Dividend of India, a Historical and Analitycal study' (भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा : एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन) हा प्रबंध लिहिला. १९१७ साली वरील प्रबंध 'ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती' (Evolution of Provincial Finance in British India) या नावाने प्रसिद्ध झाल्यावर त्यांना कोलंबिया विद्यापीठाची Ph.D. ही पदवी मिळाली. ऑक्टोबर १९१६ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेश घेतला. दरम्यान
शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने वर्षभरातच त्यांना भारतात परतावे लागले. १९९७ : मुंबईत 'वर्स कॉलेज' या खाजगी व्यापारी शिक्षण संस्थेत काही काळ अर्थशास्त्र, बँकिंग व कायदा या विषयांचे अध्यापन.
नोव्हेंबर १९१८ : मुंबईच्या सिडनेहॅम कॉमर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती.
सिडनेहॅम कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र हा विषय शिकवत असत.
सप्टेंबर १९२० या वर्षीच राजर्षी शाहूंच्या आर्थिक सहाय्यामुळे बाबासाहेब पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. १९२१ : लंडन विद्यापीठाची M.Sc. पदवी प्राप्त.
दरम्यान बाबासाहेबांनी काही काळ जर्मनीतील बॉन विद्यापीठात कायद्याचा
१९२३ - बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण. १९२८ : Mumbai Govt College Teaching work (मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य)
१९३५-३८ या काळात Mumbai Govt College Principle
मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य,
२७ मे १९३५ : बाबासाहेबांच्या प्रथम पत्नी रमाबाई (रामीबाई) यांचे निधन झाले. १५ एप्रिल १९४८ : डॉ. शारदा कबीर या ब्राह्मण विदुषीशी दुसरा विवाह. लग्नानंतर सविता आंबेडकर असे नाव.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक सुधारणा : १४ जून १९२८ : डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना. .
या संस्थेमार्फत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज (१९४६) तर औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची (१९५०) स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय कारकीर्द : मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती (१९२६-१९३६)
१९२८ च्या सायमन कमिशनला भारतभर विरोध होत असताना डॉ. बाबासाहेबांनी कमिशनसमोर अस्पृश्य बांधवांच्या समस्या मांडल्या.
१९३३ : बाबासाहेबांनी विधीमंडळात ग्रामपंचायत बिलावर भाषण केले.
१९३० ते १९३२ लंडन येथील तिन्ही गोलमेज परिषदांना अस्पृश्य बांधवांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब उपस्थित होते.
बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत दलित बांधवांना प्रोटेस्टंट हिंदू किंवा नॉन कनफर्मिस्ट हिंदूंचा दर्जा मिळावा अशी मागणी केली.
२४ सप्टेंबर १९३२ : महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात येरवडा कारागृहात ऐक्य करार, १९४२-१९४६ : या काळात गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर मजुरमंत्री म्हणून नियुक्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल प्रांताच्या विधीमंडळातून घटना समितीवर निवडून आले. २९ ऑगस्ट १९४७ : संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड. .
१९४७ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कायदामंत्री. १९४८ : हिंदू कोड बिलाची निर्मिती (हिंदू कोड बिल हे अविभक्त कुटुंब पद्धती विरुद्ध होते. या बिलानुसार स्त्रिया व समाजातील इतर घटकांना समान हक्क मिळणार होते.)
१९५१ : हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा त्याग केला.
१९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाने लोकसभेच्या ३४ जागा लढविल्या.
त्यापैकी २ सदस्य निवडून आले. तर याचवेळी विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये २१५ जागा लढविल्या, त्यापैकी १२ सदस्य निवडून आले.
१९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब उत्तर-मध्य मुंबई या राखीव मतदारसंघातून पराभूत झाले
अस्पृश्य बांधवांना स्वतंत्र
डॉ. बाबासाहेबांनी साऊथबरो समितीसमोर साक्ष मांडताना प्रांतिक कायदेमंडळात अस्पृश्य बांधवांना स्वतंत्र
प्रतिनिधित्व देण्यासंबंधी शिफारस केली. कायदेमंडळात कामगार खात्याचे मंत्री असताना बाबासाहेबांनी १९४२ ते १९४६ या कालावधीसाठी पुनर्बांधणी व पुनर्वसन योजना' राबविली. पहिल्या पंचवार्षिक योजनेत या योजनेचा आधार घेण्यात आला.
अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन: १८ जुलै १९४२ रोजी स्वतंत्र मजूर पक्षाचे रूपांतर 'अ. भा. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षात झाले. (पक्ष मुख्यालय नागपूर)
ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या स्थापनेमागे आप्यादुराई यांची प्रेरणा होती. 'शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' या पक्षाचे रुपांतर पुढे 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' या पक्षात झाले. (पक्षाचे चिन्ह हत्ती)
नागपूर येथे त्यांनी व्यापक तत्त्वज्ञानावर आधारित नव्या 'रिपब्लिकन पार्टी' या पक्षाची घोषणा केली होती, मात्र त्यांचे हे स्वप्न त्यांच्या निधनानंतर प्रत्यक्षात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्था : बहिष्कृत हितकारिणी सभा : २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे या सभेची स्थापना.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष, तर सीताराम शिवतरकर हे सचिव होते.
उद्देश अस्पृश्य बांधवांना शिक्षण देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे. बहिकृष्त हितकारिणी सभेचे ब्रीदवाक्य : 'शिका, चेतवा व संघटीत व्हा.
बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्य बांधवांसाठी वाचनालये, प्रौढ रात्रशाळा सुरू करण्यात आल्या. ४ जानेवारी १९२५ रोजी या सभेच्या वतीने सोलापूर येथे बसतीगृह स्थापन केले.
२० मार्च १९२७ : बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह महाड (जि. रायगड) येथे चवदार तळे सत्याग्रह केला.
२५ डिसेंबर १९२७ : महाड येथील सत्याग्रह परिषदेत अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या 'मनुस्मृती' या धर्मग्रंथाचे दहन. या परिषदेचे स्वागताध्यक्ष होते दिपू संभाजी गायकवाड.
याचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. ● डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली हिंदू मंदिर प्रवेशाची चळवळ ही अस्पृश्य बांधवांच्या सामाजिक गुलामगिरीची बंधने तोडण्यासाठी केलेली चळवळ होती.. मंदिर प्रवेश चळवळीमुळे १९३५ मध्ये काळाराम मंदिर अस्पृश्य बांधवांना खुले झाले. त्यानंतर एलिचपूर येथील
दत्तमंदिर, अमरावतीचे अंबेचे मंदीर, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर इ. मंदिरांच्या सत्याग्रहाच्या चळवळी पुढे आल्या.
● १९३३ : हिंदू धार्मिक ग्रंथाच्या पारायणासाठी मुखेड येथे सत्याग्रह..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य :
१४ एप्रिल १९२९ : चिपळूण येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद बाबासाहेबांनी भूषविले.
१० जानेवारी १९३८ : कोकणातील 'खोती' पद्धत नष्ट करण्याच्या मागणीसाठी बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळावर २५ हजार शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढला. • बाबासाहेबांनी 'शेतीचे राष्ट्रीयीकरण' ही संकल्पना मांडली. • बाबासाहेबांनी पाण्याच्या नियोजनासाठी 'दामोदर खोरे परियोजना' ही संकल्पना मांडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतर : १३ ऑक्टोबर १९३५ :
(नागपूरला दीक्षाभूमी असे संबोधले जाते.) १४ ऑक्टोबर हा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. ● ब्रह्मदेशचे (म्यानमार) चंद्रमणी महास्थवीर यांनी आंबेडकरांना बौद्धधर्माची दीक्षा दिली.