महर्षी धोंडो केशव कर्वे माहिती | Maharshi Dhondo Keshav Karve Information
स्त्री शिक्षण व स्त्री स्वातंत्र्याचा उद्गाता, विधवाविवाहाचा पुरस्कर्ता व उक्ती आणि कृती यामध्ये एकवाक्यता साधणारा ऋषितुल्य समाजसुधारक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांना भारतीय समाजसुधारणा चळवळीत मानाचे स्थान आहे.
महर्षी धोंडो केशव कर्वे माहिती
महर्षी कर्वे म्हणतात, 'स्त्रीशिक्षणासाठी केलेले विचार व उच्चार हिच परमेश्वराची प्रार्थना होय."
महर्षी कर्वेचा ऋषितुल्य जीवनवृत्तांत : जन्म: १८ एप्रिल १८५८, मुरुड, शेरवली (जि. रत्नागिरी) येथे.
शिक्षण: मुरूड (ता. दापोली) येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण. • मुरूड येथील सोमण गुरुजींकडून त्यांना निःस्वार्थीपणाची व लोकसेवेची प्रथम प्रेरणा मिळाली.
इयत्ता सहावीची परीक्षा सातारा येथे देण्यासाठी महर्षी कर्वे मुरूड ते सातारा हे १२५ मैलांचे अंतर कुंभार्ली घाटातून तीन दिवस पायी चालून मेले.
१८७३ : कर्वेचा राधाबाईंशी विवाह.
१८८० : मुंबईत मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण,
महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्वे प्रथम विल्सन कॉलेजात व त्यानंतर एल्फिनस्टन कॉलेजमध्ये गेले.
१८८४ : एल्फिनस्टन कॉलेजमधून (मुंबई) गणित विषयांत बी. ए. पदवी प्राप्त.
काही काळ मुंबईतील मुलींच्या विद्यालयात गणिताचे शिक्षक म्हणून नोकरी. लोकमान्य टिळक फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते.
राष्ट्रीय चळवळीत पूर्णवेळ काम करण्यासाठी टिळकांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गोपाळ कृष्ण गोखले यांनी कर्वे यांना टिळकांच्या जागी नियुक्त केले. १८९१ ते १९१४ या काळात कर्वे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते.
१९१४ साली महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमधून निवृत्त झाले.
महर्षी कर्वेच्या जीवनास कलाटणी देणारी क्रांतिकारी घटना :
१८९१ साली पत्नी राधाबाई यांचे निधन झाल्याने कर्वेनी १८९३ साली गोदुबाई यांच्याशी पुनर्विवाह केला. गोदुबाई या पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमधील विधवा परित्यक्ता आणि बाळकृष्ण जोशी यांच्या कन्या होत.
गोदुबाईंना आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे या नावेही ओळखले जात असे.
गोदुबाई या विधवेशी विवाह केल्याने मुरूडच्या जनतेने त्यांना वाळीत टाकले.
गो. ग. आगरकरांनी कर्वेच्या पुनर्विवाहास पाठिंबा देताना त्यांच्या लग्नपत्रिकेवर सही केली होती. महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या विविध संस्था :
अ) विधवा विवाहोत्तेजक मंडळ : १८९३ साली पुणे येथे विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना.
या संस्थेमार्फत पुनर्विवाहाचे कुटुंब मेळावे भरविण्यास कर्वेनी प्राधान्य दिले. २१ मे १८९४ रोजी असा पहिला मेळावा संपन्न.
च) अनाथ बालिकाश्रम : १ जानेवारी १८९९ पासून विधवा स्त्रियांसाठी (बालविधवांसाठी) 'अनाथ बालिकाश्रमाचे' कार्य सुरू.
विधवा स्त्रियांना स्वावलंबी जीवन जगता यावे तसेच त्यांचे मानसिक व बौद्धिक सामर्थ्य वाढविण्यासाठी या संस्थेची स्थापना. या संस्थेत सुरूवातीस ६ विधवा महिला होत्या.
अनाथ बालिकाश्रम ही संस्था प्रथम पुण्यातील सदाशिव पेठेत गोरेंच्या वाड्यात स्थापन करण्यात आली होती. पुण्यात प्लेगची साथ आल्याने ही संस्था १९०० साली पुण्याजवळील हिंगणे येथे स्थलांतरित करण्यात आली. हिंगणे येथे रावबहाद्दूर गणेश गोखले यांनी या संस्थेसाठी आपली सहा एकर जमीन व रु. ७५० दिले.
'अनाथ बालिकाश्रम' या संस्थेस दामोदरपंत फाटक व श्रीमती यशोदाबाई फाटक या दाम्पत्याचे सहकार्य लाभले.
टीप : विकिपीडियावर अनाथ बालिकाश्रमाची स्थापना '१४ जून १८९६' रोजी झाली अशी नोंद आढळते.
क) महिला विद्यालय : १९०७ साली हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना.
अण्णांची मेहणी पार्वतीबाई आठवले या महिला विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी.
१९१९ महिला विद्यालयाचे रूपांतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये झाले.
स्त्रियांना मातृभाषा व इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून शिक्षण देण्यात यावे असे कवेंचे मत होते. ड) निःष्काम कर्ममठ : १९१० साली निःष्काम कर्ममठाची स्थापना. (अण्णांच्या चरित्रात हे वर्ष ४ नोव्हेंबर १९०८असे आहे.)
निःष्काम कर्ममठाचे ब्रीद 'समाजसेवा हा आमचा देव व सेवेच्या उपयुक्ततेविषयी खात्री ही आमची श्रद्धा.
• उद्देश: लोकसेवेसाठी निःष्काम बुद्धीने तन, मन, धन अर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण करणे हा निःष्काम कर्ममठाच्या स्थापनेमागील उद्देश होता.
इ) महिला विद्यापीठ : ३ जून १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना.
• महाराष्ट्रातील तद्वतच भारतातील या पहिल्या महिला विद्यापीठात सुरुवातीस केवळ ५ विद्यार्थिनी होत्या. होती.
या विद्यापीठाच्या स्थापनेमागे जपानमधील महिला विद्यापीठाची प्रेरणा
महिला विद्यापीठाचे बोधवाक्य : 'संस्कृता स्त्री पराशक्ती:
१९२० मध्ये सर विठ्ठलदास ठाकरसी या दानशूर व्यक्तीने आपल्या मातोश्री श्रीमती नाथीबाई यांच्या स्मरणार्थ महिला विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. त्यामुळे १९४९ पासून हे विद्यापीठ 'श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (S.N.D.T.) महिला विद्यापीठ' या नावे ओळखले जाते.
ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळे, १९३६ : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने स्थापना. उ) समता संघ, १९४४ : जातिभेद व अस्पृश्यतेचे निर्मूलन करून समता प्रस्थापित करणे हे समता संघाचे उद्दिष्ट होते. जुलै १९४७ मध्ये कर्वे यांनी 'मानवी समता' हे मासिक सुरू करून समता संघाची उद्दिष्टे स्पष्ट केली.
महर्षी कर्वे यांच्या कार्याचा गौरव : महर्षी कर्वे यांना पुढील विद्यापीठांनी क्रमाने पदव्या दिल्या. D.Lit : बनारस विद्यापीठ (१९४२, सर्वप्रथम); पुणे विद्यापीठ (१९५१); S.N.D.T. महिला विद्यापीठ
(१९५४) या विद्यापीठांनी कर्वेना 'डि.लिट.' ही पदवी दिली.
@ L.L.D. : मुंबई विद्यापीठाने १९५७ साली कर्वेना L.L.D. ही सर्वोच्च पदवी दिली. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीने महर्षी कर्वे यांना आजीव सदस्यत्व बहाल केले होते.
● महर्षी कर्वे यांच्या ७१ व्या वाढदिनी पुणे मनपाने पुण्यातील रस्त्यास 'महर्षी कर्वे रोड' असे नाव दिले. ● मुंबईतील 'क्विन्स रोड' या रस्त्याचे नामकरण 'महर्षी कर्वे रस्ता' असे करण्यात आले.
● महर्षी कर्वे यांना लाभलेले पुरस्कार पद्मविभूषण (१९५५); भारतरत्न (१९५८) महर्षी कर्वेचे आत्मचरित्र : १) आत्मवृत्त (१९२८ मराठी आत्मचरित्र); २) Looking Back (१९३६ इंग्रजी आत्मचरित्र)
"माझ्या संस्था मला माझ्या आप्ताहून व प्राणाहूनही प्रिय वाटतात' - महर्षी कर्वे
१८८५ साली अण्णांनी आपल्या कमाईतील ५% वाटा 'मराठा ५% फंड' या शैक्षणिक निधीस दिला.
१८८८ : मुरूड फंडाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली. शिक्षणोत्तेजक मंडळाची स्थापना महर्षी धों. के. कर्वे • विधवा आश्रम स्थापना महर्षी धों. के. कर्वे
बालिका सुधारगृह (अनाथ बालिकाश्रम) ची स्थापना : महर्षी धों. के. कर्वे
भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी धों. के. कर्वे व्यापारोत्तेजक सहकारी मंडळाची स्थापना : महर्षी धों. के. कर्वे
१९१५ च्या पुणे येथील राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष महर्षी धों. के. कर्वे
• महर्षी कर्वे यांच्या जीवनावरील नाटक : हिमालयाची सावली (लेखक : वसंत कानेटकर, १९७२)
या नाटकात महर्षी कर्वे यांची तुलना हिमालयाशी करण्यात आली. अमोल पालेकर यांनी र. धों. कर्वे यांच्या जीवनावर 'ध्यासपर्व' हा चित्रपट प्रदर्शित केला.
• महर्षी कर्वे यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती : पंडिता रमाबाई, ईश्वरचंद्र विद्यासागर, हर्बर्ट स्पेन्सर
जर्मनीतील बर्लिन येथे आण्णांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांची भेट
घेतली.
निधन : ९ नोव्हेंबर १९६२ रोजी पुणे येथे वयाच्या १०५ व्या वर्षी महर्षी कर्वे यांचे निधन झाले. महर्षी कर्वे १०४ वर्षांचे समृद्ध जीवन जगले.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणास महत्त्व देतानाच त्यांचे सुपुत्र रघुनाथ धोंडो कर्वे यांनी लैंगिक शिक्षण व संततीनियमन या विषयास प्राधान्य दिले.
Nice posthttps://adttazanews.blogspot.com/2024/05/punjab-kings-ipl-team-2024-glance-into.html
उत्तर द्याहटवा