वारी संपूर्ण माहिती 2023 | Wari complete information 2023

वारी संपूर्ण माहिती 2023 | Wari complete information 2023


 'वारी' हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोकप्रवाह आहे. नामगजर करीत पंढरीपर्यंत वाटचाल करण्याची परंपरा प्राचीन आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या वडिलांनीही वारी केल्याचे उल्लेख आढळतात. त्यातूनच पुढे गुरुवर्य श्री. हैबतबाबांच्या प्रेरणेने आणि परिश्रमांनी वारीचे सुंदर आणि नेटके रूप उभे राहिले. अद्वैताचा सामाजिक स्तरावर अनुभव घ्यायचा असेल, तर एकदा तरी वारी करावीच !


वारी संपूर्ण माहिती 2023


वारी (toc)

वारी माहिती 

अद्वैताचे चिंतन तत्त्ववेत्ते करतात; पण त्याची अनुभूती मात्र वारकरी घेतात. वाटचाल करताना, त्या वाटेवरून चालणारा वारकरी आणि वाट वेगळी आहे. इथे द्वैत आहे. ज्या गावाला जायचे आहे, त्या गावाला गेल्यावर आपणच पांडुरंगमय होऊन जातो. पण वाटचालीत चालताना कुठेतरी विसावाही घ्यावा लागतो. 'द्वैतभावाची वाटचाल, अद्वैतभावाचा मुक्काम; पण प्रेमभावाचा विसावा म्हणजे पंढरीची वारी होय.' आध्यात्मिक आनंदाबरोबर स्वतःच्या जीवनाला वळण लावणारा तो एक संस्कारप्रवाह आहे. संत चोखोबाराय म्हणतात, “गंगेला अनेक ओहोळ मिळतात; पण गंगेच्या पात्रात गेल्यावर ते गंगारूप होतात. गंगेला मिळाल्यावर ते कसे शुद्ध होतात हे गंगेलाही समजत नाही; आणि त्या ओढ्या- नाल्यांच्या प्रवाहांनाही !" वारीचेही असेच आहे. कुणीही खटनट यावे आणि शुद्ध होऊनी जावे; ही वारीची किमया आहे. जीवनाचा प्रवाह हा या वारीच्या प्रवाहात असाच विरून जायला हवा. मग अहंकार संपेल. द्वैत सांडेल. विषमता नाहीशी होईल. विषयवासना तर तळाशी जाऊन बसतील आणि पुन्हा डोकेही वर काढणार नाहीत.

वारी हा जसा आध्यात्मिक सुखाचा प्रवाह

वारी हा जसा आध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे, तशीच ती एकात्मतेची गंगोत्री आहे. खांद्यावरची भगवी पताका, हे त्या एकात्मतेचे भव्य आणि दिव्य प्रतीक आहे. सारे भेदभाव विसरून, एकरूप होण्यासाठी, दिंडीच्या माध्यमातून सामाजिक समतेची परंपराच संतांनी प्रस्थापित केली; आणि तुकोबाराय आनंदाने गाऊ लागले,

सोपे वर्म आम्हां सांगितले संती । 

टाळ दिंडी हाती घेऊनि नाचा ॥


परब्रह्माला साठवीत साठवीत, विवेकाच्या दिशेने होणारी उन्नत वाटचाल म्हणजे 'वारी'. मानवी जीवनात, परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकीं पाऊल म्हणजे 'वारी' हे परिवर्तन अविवेकाकडून विवेकाकडे नेते. अज्ञानातून ज्ञानाकडे नेते, विकारातून विचाराकडे नेते. ज्ञानरूप परमात्मा हे साध्य; तर भक्तिरुय वाटचाल हे साधन ठरते. साध्य आणि साधन हे दोघेही आनंदरूपच. 'प्रेम' आणि 'नेम' ही वारीची दोन अंगे आहेत. काही वारकऱ्यांच्या घरात पिढ्यान्पिढ्या वारी चालत आहे. शेकडो वर्षांचा वारीचा नेम कधीही चुकलेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, 'पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ।।' नेमाने ही भगवत्प्रेमाची वाटचाल घडावी; म्हणजे खऱ्या अर्थाने 'पंढरीचा वारकरी' म्हणविण्यात अभिमान वाटेल असे तुकोबारायांना वाटते. जसे भजन, पूजन, चिंतन नेमाने घडावे; तसेच सदाचारी, विवेकी वाटचाल नेमाने व्हावी ही देखील त्यामागची खरी भावना आहे.


ज्ञान, ध्यान आणि समाधान :Knowledge, Meditation and Contentment

ज्ञान, ध्यान आणि समाधान यांचे एकत्रीकरण म्हणजे पंढरीची वारी. ज्ञानेश्वर माउली म्हणतात.


जें अग्नीचें दीपन । 

जें चंद्राचें जीवन । 

सूर्याचे नयन । देखती जेणें ।।

 ज्ञाने. १३.१७.९२७ ।।


अग्नी देदीप्यमान खरा; पण त्याला दिव्यता देणारा कोण ? चंद्र हा अमृतासारखा शीतल; पण त्याला अमृतत्व देणारा कोण ? सूर्य हाच विश्वचक्षू आहे. तो उगवल्यावर विश्व धवळते; पण सूर्यालाही विश्वाकडे पाहण्याची दृष्टी देणारा कोण ? या अद्वितीय, शक्तिमान दिव्यत्वाचा शोध म्हणजेच ज्ञान. ते तर वारकऱ्यांनी विठ्ठलरूपात पाहिले. ज्ञानेश्वर माउली वर्णन करतात, 'पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फाकती प्रभा ।' पांडुरंगाच्या दर्शनात दिव्य तेजाची अनुभूती यावी; पण त्यासाठी वाटचालीत पडणाऱ्या प्रत्येक

पावलागणिक नामगजराबरोबर पांडुरंगाचे 'ध्यान' पहावे हेच वेगळेपण,एका अरण्यात अनेक साधक तपाला बसले. तपाचे फळ द्यायलाच हवे; म्हणून ब्रह्मदेवाने प्रत्येकाजवळ जाऊन विचारले की, "तुला काय हवे?” माला



राज्य, कुणाला संपत्ती, कुणाला वैभव. प्रत्येकाचे मागणे वेगवेगळे होते. बराच विचार करून ब्रह्मदेवाने एक मोठा कमंडलू तिथे उभा केला आणि सांगितले, "ज्याला जे हवे आहे ते या कमंडलूच्या तोटीतून मिळेल!" ज्याला जे हवे ते मिळत गेले. एकाने विचार केला, 'कमंडलूच्या तोटीतून मागेल त्या गोष्टी बाहेर पडत आहेत. मग ह्या कमंडलूच्या तळाशी केवढा साठा असेल!' त्याने ब्रह्मदेवाला सांगितले, "देवा, ह्या कमंडलूच्या तळाशी जे आहे, ते मला दे !" ब्रह्मदेव म्हणाले, "नाही. ते मला तुला देता येणार नाही. धन घे, संपत्ती थे, राज्य घे; पण तळाशी ने ठेवले आहे ते आहे समाधान; आणि ते माझ्या वैष्णव वारकऱ्यांसाठी ठेवलेले आहे !"


तुका म्हणे काही न मागे आणिक । तुझे पायी सुख सर्व आहे ॥


ज्ञान, ध्यान, समाधान देणारी अनुभूती म्हणजे 'वारी' होय. भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन, सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारी ती नैतिकतेची मूर्तिमंत पाठशाळा आहे. ज्ञानवंतांनी त्या परब्रह्माचे ज्ञानस्वरूप उभे केले; तर भोळ्या भाविकांनी भक्तिभावाने त्याचे भावदर्शन अनुभवले. नामदेव महाराज एका अभंगात वर्णन करतात,


ज्ञानियांचे ज्ञेय ध्यानियांचे ध्येय पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू ॥ 

जे तपस्वियांचे तप जे जपकांचे जाप्य । 

योगियांचे गौप्य परमधाम ॥

 ते हे समचरण उभे विटेवरी । 

पहा भीमातीरी विठ्ठलरूप ॥


ज्याला ज्ञानाने जाणायचे ते म्हणजे 'ज्ञेय'; तर ध्यानाने ज्याला गाठायचे आहे, ते 'ध्येय', असे ज्ञानियांचे हेय, ध्यानियांचे ध्येय, तपस्वियांचे तप जपकांचे जाप्य, योगियांचे गौप्य जिथे विटेवर समचरण उभे आहे, त्याला प्रेमाने आलिंगन देण्यासाठी निघालेला वैष्णवांचा महामेळा म्हणजे 'विडी' होइ ज्ञान आणि प्रेम हातात हात घालून चालू लागतात.फळांमधला रस, फुलांचा वास, शब्दांचा अर्थ आणि भक्तीचे सामर्थ्य हेच खरे स्वाभाविक सौंदर्य, या सौंदर्याला, सदाचाराच्या सुगंधाने गंधित करणारी वाटचाल म्हणजेच 'पंढरीची वारी'.


आषाढीला आणि कार्तिकीला पंढरीला नामाचा बाजार भरतो; भक्तीची पेठ फुलते आणि विठ्ठलाची भेट घडते. त्या भक्तीचे मूर्त रूप म्हणजे वारी होय. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी एकरूप झालेल्या लोकजीवनाचे, उत्कट भावदर्शन म्हणजे चारी.


पंढरपुरा नेईन गुढी :


पंढरपूरची वारी निश्चित केव्हा सुरू झाली ? हे सांगणे कठीण आहे. ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. ज्ञानदेवांच्या घराण्यात, पंढरीच्या वारीची मिराशी होती.


माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥ १ ॥

पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ॥ २ ॥


या आर्त ओढीने ते पांडुरंगाची भेट घेत होते. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे देखील पंढरीचे वारकरी होते. विठ्ठलभक्तीचा मार्ग आणि पंढरीच्या वारीची दीक्षा ज्ञानदेवांना दिली ती श्रीनिवृत्तिनाथांनी. ज्ञानदेव म्हणतात, "माझ्या सद्गुरूंनी माझ्या डोळ्यांत कृष्णाजन घालून, मला याच वाटचालीची दृष्टी दिली. मी कृतार्थ झालो !" पंढरीच्या वाटेवर अद्वैत आनंदाचा वर्षाव होत आहे; आणि पंढरीनगरीत आनंदाची पेठच भरली आहे; याचा साक्षात्कार ज्ञानदेवांना झाला. पंढरपूरच्या भेटीने तेही प्रभावित झाले.


'वारी'ची परंपरा :Wari'chi tradition


'मार्ग दाऊनी गेले आधी' या नात्याने, सकल संतपरंपरेने ज्ञानदेवांनी दिलेल्या या मार्गावरून वाटचाल सुरू केली. ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर, तत्कालीन नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार आदी संतमंडळींनी भजनाची दिंडी तयार केली आणि आळंदीस दर्शनाकरिता येण्याचा प्रघात सुरू झाला. ज्ञानदेवांच्या अगोदरही पंढरपूरला जाण्याचा प्रघात होता. आता ही सारी पायी जाणारी मंडळी, त्या दिंडीत सामील झाली. जसजसा काळ वाढला, तसतशी त्यात भर पडत गेली. वैष्णवांची, वारकऱ्यांची संख्याही वाढू लागली. त्या काळच्या साधुसंतांनी हा प्रघात चालू ठेवला. श्रीएकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लाप्पा वासकर आदी 


संतपरंपरेने हा पुण्यमार्ग वाढविला आणि पालखीचे स्वरूप तयार झाले असे विधान ह. भ. प. श्री. स. के. नेऊरगांवकर यांनी केले आहे.




विविध संतांच्या पालख्या :


पालखी सोहळ्याच्या माध्यमातून, महाराष्ट्रातल्या अनेक संतांच्या दिंड्या आणि पालख्या निघतात. त्या त्या संतांची प्रतीके म्हणून, चांदीच्या पादुका पालखीत घालून, टाळ-मृदंगांच्या गजरात गावोगावचे वारकरी त्यात सहभागी होतात. त्यात प्रामुख्याने श्रीज्ञानेश्वर महाराज (आळंदी), श्रीनिवृत्तिनाथ महाराज (त्र्यंबकेश्वर), श्रीसोपानदेव महाराज (सासवड), श्रीमुक्ताबाई (एदलाबाद), विसोबा खेचर (औंधा नागनाथ), गोरा कुंभार (तेर), चांगदेव (पुणतांबे). जगमित्र नागा] (परळी वैजनाथ), भानुदास आणि एकनाथ (पैठण), राघवन्य (आनंद गुंजीटी), केशवचैतन्य (ओतूर), तुकाराम महाराज बोधले (धामणगाव), मुकुंदराव (आंबेजोगाई), जोगा परमानंद (बार्शी) कान्होज महाराज (केंदूर), संताजी जगनाडे (सुदुंबरे) या पालख्यांचा समावेश होतो. या 'साच्या पालख्या, 'वाखरी' जवळ एकत्र येतात. सारे संत, सारे वैष्णव एकमेकांना भेटतात. वाखरीला प्रचंड मोठे रिंगण होते. वाखरीतील वैष्णवांचा, वारकऱ्यांचा हा भव्य सोहळा पाहिल्यावर, 'विठूचा गोतावळा' किती व्यापक आहे; याची प्रचिती येते.


हैबतबाबांचे कार्य :

आपण आज जो पालखीचा शिस्तबद्ध सोहळा पाहतो; त्याला नेटके रूप दिले आहे ते श्री. हैबतबाबा आरफळकर या सत्पुरुषाने स्वतः सरदार असलेले हैबतबाबा, अध्यात्माकडे वळले आणि उर्वरित आयुष्य ईश्वरचिंतनात घालवावे या हेतूने प्रेरित होऊन, ते आळंदीला आले. ज्ञानदेवांच्या समाधीसमोर ते भजन करू लागले. ते ज्या विशिष्ट क्रमाने भजन म्हणत असत, त्यातूनच आजची 'भजन मालिका' तयार झाली. 'ज्ञानदेवांचे श्रेष्ठ भक्त' म्हणून हैबतबाबा ओळखले जाऊ लागले. हैबतबाबांच्या पूर्वी, माउलींच्या पादुका गळ्यात घालून नेत असत. पण हैबतबाबांनी ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका पालखीतून नेण्याची व्यवस्था केली. पालखीसाठी त्यावेळचे औंधचे राजे, पंतप्रतिनिधी यांच्याकडून हत्ती, घोडे मागविले. बेळगांव जिल्ह्यातील अंकली गावचे सरदार शितोळे यांचे आणि हैबतबाबांचे मैत्रीचे संबंध होते. बाबांनी सरदार शितोळ्यांकडून घोडे, तंबू 

तसेच सामान वाहण्यासाठी बैलगाड्या, नैवेद्य वगैरेंसाठी सेवेकरी; लवाजमा मिळवला आणि पालखी सोहळ्याला वैभव प्राप्त झाले. हैबतबाबा स्वतःच लष्करातील अनुभवी असल्याने, त्यांनी वारी सोहळ्याला लष्करी शिस्त घालून दिली. आजही वारीची शिस्त वाखाणण्याजोगी असते. लक्षावधी वारकऱ्यांवर शिस्तीचे नियंत्रण ठेवण्यासाठी, कधी पोलिसफाटा, सुरक्षा जवान यांची आवश्यकता भासत नाही. प्रत्येक वारकरी हा स्वयंशिस्तीने बांधलेला असतो. चालताना, मुक्कामाच्या जागा निश्चित करताना; आणि विशेषत वारीतील रिंगणाच्या वेळी, वारकऱ्यांमधील स्वयंशिस्तीचे दर्शन घडते. म्हणूनच 'वारी हा लष्करी शिस्तीचा आध्यात्मिक आविष्कार आहे,' असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हा सारा


वारी एक संस्कारप्रवाह :


आध्यात्मिक आनंदाबरोबरच स्वतःच्या जीवनाला वळण लावणारा तो एक संस्कारप्रवाह आहे. नित्याच्या व्यवहारात वावरताना, आपण स्वतःविषयीचा वृथा अहंकार मिरवत असतो. मी अमुक आहे, मी असा आहे, ही जाणीव सतत घडवत असतो. वारीच्या या व्यापक जनप्रवाहात एकरूप झाल्यावर, मी खरा कोण आहे ? याची जाणीव होते. आपण आपले व्यक्तित्व (आयडेंटिटी) विसरतो. या जगप्रवाहात आपण किती थिटे आहोत, हे समजते. स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारी ही वारी, वाटचालीमध्येही स्वावलंबन शिकवते. समाजमनात मिसळायला शिकविते. वृत्तीतील ताठरपणा आणि अहंकार बाजूला सारून अंतर्मुख व्हायला शिकविते. सर्वाशी एकरूप होऊन, स्वतःकडे विनम्रता घ्यायला शिकविते. खोट्या फुशारकीत वावरणाऱ्या मुखवट्यांना दूर करून, जीवनातील खरा प्रामाणिकपणा शिकविते. जगात आपल्यापेक्षा खूप मोठी माणसे आहेत, आपण त्यांच्या ठायी नम्र व्हायलाच हवे; या भूमिकेतून स्वतःला लहान व्हायला शिकविते. समाजात हरविलेली अनेक जीवनमूल्ये आपण वारीतून मिळवू शकतो. म्हणूनच चोखोबाराय म्हणतात,

खटनट यावे शुद्ध होऊनि जावे । दवंडी पिटी भावे चोखा मेळा ॥ टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट ही चालावी पंढरीची ॥


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.