गुढीपाडवा माहिती | Gudhipadwa Information

गुढीपाडवा माहिती Gudhipadwa Information     

 प्रत्येक जाती धर्मात वेगवेगळे सण ,उत्सव साजरे केले जातात.हे सण उत्सव एक वेगळाच आनंद नि मनाला उभारी देऊन जातात. घरातील वातावरण प्रसन्न करतात. घरातील सर्व मंडळी हेवेदावे विसरून सण साजरा करतात. थोडक्यात सण उत्सव आपल्या दैनदीन जीवनात एक वेगळी चेतना आणण्याचे काम करतात. आपण 1 जानेवारी इंग्रजी नव वर्ष  दिन साजरा करतो पण हिंदू नववर्षाचा पहिला दिवस ज्या सणाची माहिती आज जाणून घेणार आहोत तो सण म्हणजे गुढीपाडवा.



गुढीपाडवा Gudhipadwa माहिती(toc)

गुढीपाडवा या विषयी  पुराणातील उल्लेख  

 सृष्टी निर्मिती दिन 

असी एक अख्यायिका सांगितली जाते की या सृष्टीवर एकही जीव नव्हता  त्यावेळी  ब्रह्मा , विष्णु व महेश हे तीन जीव प्रथम भूमीवर अवतरले. हे एकमेकांशी चर्चा करू लागले. या चर्चेत तिघांनी असे ठरवले की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करावी. विष्णू देवाने सर्वांचे पालन पोषण करावे तर महेश म्हणजे शंकर संहार करण्याचे ठरले . या कथेनुसार ज्या दिवशी ब्रह्मदेवाने या  सृष्टीची निर्मिती झाली तो दिवस म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस होय. म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.  


 प्रभू रामांचे वनवसातून आयोध्येत आगमन :  

   प्रभू राम १४ वर्षे वानवासला गेले . त्यांना वनवासात अनेक बरेवाईट अनुभव आले. या प्रवासात त्यांनी  अनेक वाईट प्रवृत्तीचे   लोक देखील भेटले. त्यांनी अशा  वाईट लोकांचा म्हणजे अनेक राक्षसांचा  वध केला. व ज्या दिवशी ते वनवसातून परत आले तो दिवस किंवा त्यांचे स्वागत म्हणून गुढ्या उभारल्या असे सांगितले जाते. 

इंद्र देवाकडून उपरिचर राजास भेट

   उपरिचर हा एक पराक्रमी राजा होता . या राजाला अनेकदा इंद्र देवाने मदत केली . एके दिवशी इंद्र देवाने एक बांबूची काठी उपरिचरस भेट दिली. ती काठी एकडे तिकडे न ठेवता इंद्र देवाचा आदर म्हणून उपरिचरणे ती काठी एका पाठवर उभी करून तिला एक शेला बांधला. आज देखील काही लोक उपरणे किंवा केशरी शेला  गुढीला बांधतात असा या मागील इतिहास आहे. 

गुढीपाडवा इतिहास

शालिवाहन राजाने शकांचा पराभव :

 शालिवाहन राजाने सामान्य लोकांवर अन्याय करणाऱ्या शकांचा पराभव याच दिवशी केला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा . या दिवसंपासून शालिवाहन राजाने आपल्या नावाने कालगणना सुरू केली ती म्हणजे शालिवाहन शक होय. एप्रिल २०२२ मध्ये शालिवाहन शके १९४३ संपून १९४४ शालिवाहन शक सुरू झाले. थोडक्यात इंग्रजी कॅलेंडर व मराठी कॅलेंडर यात ७८ वर्षांचे अंतर आपल्याला पाह्यला मिळते. भारतीय पंचांग,जोतिष शस्त्र शालिवाहन शकनुसार मुहूर्त ,तिथी पाहत असतात. आजही कोणताही समारंभ ,मुंज विवाह यासाठी काही मंडळी हे पाहताना  दिसतात.थोडक्यात हिंदू धर्मात शालिवाहन शकाला विशेष महत्त्व आहे. 

गुढीपाडवा - पुराण कथा व अख्यायिका 


  आपण पहिले की हाच तो दिवस ज्या दिवशी या विश्वाची निर्मिती झाली आणि आपण भाग्यवान की आपल्याला नरदेह म्हणजे मानवाचा देह मिळाला.म्हणून त्या ईश्वराचे मनोमन आभार मानण्याचा हा दिवस. प्रभू राम वनवसातून परत आले याचा अर्थ मानवी जीवनात सुख आहे त्या जोडीला दुख देखील आहे याचा स्वीकार करणे, असत्यावर सत्याचा विजय. रावण आज नाही पण आपल्यातील वाईट प्रवृत्तीना तिलांजलि देण्याचा हा दिवस  म्हणजे गुढीपाडवा. एका मित्राने दिलेली काठी तिला शेला बांधून आदर  झाला तो हा दिवस. मग आपल्याला जे मित्र भेटले त्याना केवळ शुभेच्या न देता प्रत्यक्ष भेटून किंवा विचारपूस करून त्याने आपल्यावर केलेल्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस. 

 या सणांची माहिती जमवून त्याचे महत्त्व  जाणून आजची जी नवीन पिढी केवळ मोबाईल नि कार्टून मध्ये अडकळत चालली आहे तिला ही आपली महान संस्कृति समजवली पाहिजे. व आपण देखील समजावून घेतली पाहिजे.  

गुढीची उभारणी :  

या सणाच्या दिवशी सकाळी दिवस उगवण्याच्या सुमारास  एक बांबूची किंवा वेताची काठी धुवून घेतात. त्या काठीला कोण नवी साडी ,शेला किंवा घरातील नवीन कपडा,एक छोटासा फुलांचा हार व एक कडूनिंबाची डहाळी व साखरेची घाटी बांधतात व एक तांब्याचा तांब्या किंवा स्टील ग्लास त्या काठीवर पालथा ठेवतात  पालथा ठेवतात . ती काठी पाठावर उभी करतात किंवा तिला उभी करून ठेवतात. तिच्या बाजूला छान रांगोळी काढली जाते . या गुढीची पूजा करून कडूनिंबाची पाने व गूळ यांचे एकत्रित मिश्रण केले जाते व हा प्रसाद म्हणून वाटला जातो. घरातील सगळी मंडळी नवी वस्त्रे परिधान करतात.  

गुढी ,नैवेद्य यातील अध्यात्म व आयुर्वेद :                 

गुढीला जो गूळ व लिंबाच्या  पानाचा व गुळाचा  प्रसाद केला जातो तो हेच सांगतो जीवनात सगळे दिवस सारखे नसतात. काही दिवस कडू म्हणजे वाईटही असू शकतात तर कधी गुळाप्रमाणे गोंड देखील  शकतात. तर आयुर्वेद सांगते ही मिश्रण खल्याने पित्त,पोटातील व्याधी व त्वचा विकार कमी होतात.म्हणून यांचे सेवन करायला हवे. तर जीवनात कधी खचून न जाता आलेल्या समस्याना तोंड दिले पाहिजे अशी शिकवण अध्यात्म शस्त्र अगदी वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा पाडवा आपल्याला देतो . मला वाटते वाचकांना  या दिवसाचे महत्त्व नक्कीच पटले असेल अजून काय होत असते या दिवशी तर 

नव्या वस्तू,सोने नाणे  खरेदी :  

हा दिवस साडे तीन मुहूर्ता पैकी एक असल्याने अनेक लोक सोन्याचे दागिने, अलंकार,नाणी तसेच काही लोक टीव्ही ,फ्रीज यासरख्या वस्तु आवर्जून खरेदी करतात.खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार या दिवशी होतात. असे म्हटले तरी चालेल.  

शोभायात्रा  :  

 आपली हिंदू संस्कृती व  तिची महानता,गौरव करण्याचा हा दिवस. म्हणून अनेक मंडळे ,सेवाभावी संस्था,राजकीय नेते मंडळी हे  शोभायत्रा म्हणजे या दिवशी अनेक लोक लहान, मुले  विविध देखावे,वस्त्रे परिधान करून आपले देव देवता,महान व्यक्ती ज्या  या भारत भूमीत जन्माला आल्या  त्यांची रुपे साकारत असतात. जसे राम ,लक्ष्मण  ,शिवाजी महाराज ,आई जिजाऊ असे आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाते. या शोभयात्रेत ढोल,ताशा यांचा गडगडाट असतो. आपण या शोभा यात्रेत सहभागी व्हायला हवे.  

खमंग पुरणपोळीचा खास बेत - 

 अजून आवर्जून सांगावेसे वाटते ते म्हणजे नववर्षाची सुरुवात म्हणून घरोघरी गृहिणी मेहनत घेऊन पुरणपोळीचे जेवण बनवतात. गावाकडे तर आवर्जून एकमेकाना एकमेकांच्या घरी जेवायला  बोलावतात. थोडक्यात आनंदी आनंद म्हणजे हा पाडवा. 


             अनेक संत भक्ति मार्गाचे महत्व पटवून देताना गुढीचे दाखले देतात. असा हा सण.  हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा . जाता जाता एवढेच म्हणेल 


“चला गुढी उभारू कर्तव्याची  

 चला गुढी उभारू सतकर्माची 

 चला सवय लावू शिक्षणाची 

  सुरुवात करू  साक्षरतेची ”

 या पवित्र दिनी एकच  आवाहन करेन 

आरोग्य हीच धनसंपदा. 









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.