ऑलराऊंडर कोणाला म्हणावे | Who to call an all-rounder
' सर्व कामात निष्णात '. म्हणजे 'जॅक ऑफ ऑल ट्रेडस 'असलेला पण जॅक ऑफ ऑल ट्रेडस असलेला बरेचदा 'मास्तर ऑफ नन '
असतो.
म्हणजे जो पूर्ण पारंगत कशातच नाही असा. असे म्हणतात की जो सगळे येत असलेला किंवा करू शकण्या चा आव आणतो तो प्रत्यक्षात काहीच करू शकत नाही. सगळ्यातला माहितीगार असणे म्हणजे कशातच काही ठाऊक नसणे. मात्र क्रिकेटमधला ऑलराऊंडर म्हणजे फक्त त्याकरता दुसरा कोणताही समर्पक शब्द नाही ज्यामुळे त्याचा संपूर्ण अर्थ उलगडला जाईल.
जो फलंदाज असतो व गोलंदाजी करतो किंवा जो गोलंदाज असून फलंदाजी करतो तो क्रिकेटमधला ऑलराऊंडर ठरत नाही . तर कसोटी पातळीचा जो खेळाडू ऑलराऊंडर असतो तो कसोटी च्या पातळीवर फलंदाज व गोलंदाज ही असतो.
एक चांगला फलंदाज किंवा गोलंदाज असणे वेगळे आणि चांगला ऑलराऊंडर असणे हे आणखी वेगळे कसोटी स्तरा च्या चांगल्या ऑर्डर च्या नावावर कसोटी सामन्यातील सर्वाधिक धावा किंवा सर्वाधिक बळी भले नसती पण त्याच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये बळीही असतात व दावाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या स्वतःच्या गोलंदाज व फलंदा जी यामुळे स्वतःच्या बळावर सामना जिंकून देण्याची क्षमता असते आपल्या गोलंदाजी व फलंदाजीच्या बळावर कसोटी सामना जिंकून देण्याची क्षमता आहे व जाने कसोटी सामन्यात असा करिष्मा कधी तरी दाखवला आहे तोच महान ऑलराऊंडर असतो.
कधी तो स्वतःच्या फलंदाजीच्या बळावर असे करून दाखवतो तर कधी गोलंदाजीच्या तर काही वेळा गोलंदाजी व फलंदाजीचे दोन्हींच्या बाळावर. कसोटी सामन्यात आपल्या गोलंदाजी व फलंदाजीच्या बळावर सामना जिंकून देण्याची क्षमता किंवा दक्षता हा एक दुर्मिळ व दुर्लभ असा गुण आहे आहे.
तुम्ही कोणत्याही वेळेच्या कोणताही संघावर नजर टाका तुमच्या लक्षात येईल की ऑलराउंडर क्षमता अतिशय दुर्मिळ आहे तशी क्षमता असलेल्या खेळाडू अगदी विरळच असतो ज्यांनी आपल्या संघाला आपल्या फलंदाजी अथवा गोलंदाजीच्या ताकत( शक्ती ) बर वन डे किंवा कसोटी सामना जिंकून दिला आहे.
म्हणून आधीच्या काळात ऑलराऊंडर कमी झाले व आजही कमीच आहे येथे होत असतात व प्रत्येक संघाला अत्यंत महत्त्वाचे व ठरत असत त्यात आणखी एक म्हणजे क्षेत्ररक्षण हा खेळाचा इतका महत्त्वाचा भाग आहे की त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही कोणत्याही ऑलराउंडर ला केवळ चांगलाच नाही तर इतका चप्पल बद्दल क्षेत्ररक्षक असणे गरजेचे आहे की त्याचे क्षेत्ररक्षण हा एक आदर्श एक उदाहरण ठरावे.
म्हणून चांगला व मॅच जिंकून देणारा फलंदाज व गोलंदाज असण्याबरोबरच चांगला क्षेत्ररक्षक ही असायला हवे.
तुम्हाला वनडे क्रिकेटचा योग्यतेची खेळाडू हजारोंच्या संख्येत मिळतील टेस्ट क्रिकेट खेळण्याच्या पातळीवर खेळाडूही शेकड्याने असतील पण कसोटी खेळण्याच्या पातळीवरील ऑल राऊंडर अगदी मोजके असतील. त्यांची संख्याही चार-पाच डजनांपेक्षा अधिक नसणार. त्यातून ही महान म्हणून गणले जातील तसे तर अक्षरशः दोन्ही हाताच्या बोटांच्या पेऱ्यांवर मोजता येतील एवढेच असतील. असे विलक्षण प्रतिभासंपन्न खेळाडू प्रशिक्षण व परिश्रमातून घडत नाही त ती परिश्रमाची भेट किंवा देणगी मानावी. ते जे काही करतात ते स्वयंप्रेरणेने व स्वविवेकाने करतात ते कधीही कोणत्याही चेंडूवर बाउंड्री मारू शकतात अन कधीही कोणत्याही चेंडूवर आउट होऊ शकतात कधीही कुणालाही आउट करू शकतात आणि केव्हाही हवा तसा चेंडू टाकू शकतात.
मिलर चे नवीन चेंडूने गुगली करणे आणि छोट्याशा रन अपने त्या दिवशीचा तीव्रतम गतीचा चेंडू फेकणे मनात आले ते बाउंड्री मारणे किंवा अशक्यप्राय असा झेल घेणे.
सोबर्स च्या मध्यम तीव्र गतीचा व स्पिन दोन्ही तरे चा चेंडू टाकणे आणि खेळताना न येणाऱ्या विकट वर ही शतक ठोकणे.
डेव्हिडसनचे लंगडत व आजारी असताना खेळणे व विकेट घेणारे चेंडू टाकण्याचे कौशल्य या क्षमतेची साक्ष देतात.
सलीम दुराणी ही असेच खेळाडू होते जेव्हा मनात येईल तेव्हा षटकार ठोकायचे आणि अगदी साध्या सोप्या चेंडूवर ही बाद ( आउट ) ही व्हायचे.
कसोटीच्या पातळीवरील बुलंद आवाज व फलंदाज म्हणजे ऑलराऊंडर खरेतर जिनिअस असतात त्यांचा खेळ व्यक्तीच्या चौकटीत बांधता येत नाही की तर्काच्या तागडीत तोलता येत नाही. तो खेळ फक्त आश्चर्यजनक असतो म्हणूनच ऑल राऊंडर क्रिकेटच्या उद्यानातील सर्वात देखणे व सुगंधी फूल म्हटले जाते.
ही गोष्ट खरीच की ते जे काही असतात ते स्वतःच्या प्रतिभे मुळेच असतात याचा अर्थ कुणी घेऊ नये कि त्याच्या आयुष्यात परिश्रम मेहनत व सरावाला काही महत्त्वच नसते जी उंची ते गाठतात त्यात मेहनतीचा वाटा असतो जो प्रतिभावंत खेळाडू अधिक अधिक परिश्रम घेऊन आपल्या प्रतिमेला योजनाबद्ध पद्धतीने पैलू पाडतो सतत सरावामुळे चपळ व निरोगी राहतो तोच खूप पुढे जातो मिलर सोबर्स बेनो बोथम कपिल इमरान व हेडली यांना जे यश मिळाले ते परिश्रम घेतल्याखेरीज मिळालेच नसते.
महिन्यात घेतली नाही तर प्रति बाही विस्कळीत होते ज्या खेळाडुंनी महिन्यात घेतली नाही ते आज लोकांच्या स्मरणात ती नाही प्रतिभा जर मूलभूत अन पहिली अट असेल तर परिश्रम किंवा मेहनत तो सोपान आहे ज्यामुळे ऑल राऊंडर खेळाडूंची वाट सोपी होते.
प्रत्येक चांगला फलंदाज व प्रत्येकच चांगला गोलंदाज जोपर्यंत खेळणार विषयीचा दृष्टीकोन निरोगी सकारात्मक आणि आनंददायक ठेवत नाही तोपर्यंत तो महान खेळाडू होऊ शकत नाही आज जे काही बघितले आहे ते यापूर्वी कधीच बघितले नव्हते असे खेळ बघणार्या प्रेक्षकांना वाटायला हवे. आणि हा अनुभव त्यांना ऑल राऊंडर खेळाडू देऊ शकतो.
क्रिकेट ही एखाद्या कलाकृती सारखा कविता किंवा संगीताच्या जलशा सारखा आनंददायक आकर्षक मनोरंजक आणि मनोहर होऊ शकतो मात्र त्यासाठी गरज आहे ते दोन्ही पक्षाकडून सहकार्य असण्याची. संघाचा कर्णधार व खेळाडूंची वृत्ती खेळ भावनेने ओतप्रोत असावी व बघणार्यांना क्रिकेट विषय प्रेम आणि खेळ बघण्याची चिकाटी असावी.