गोपाळ गणेश आगरकर माहिती | Gopal Ganesh Agarkar Information
आगरकरांचा जीवनवृत्तांत : जन्म : १४ जुलै १८५६, टेंभू (ता. कराड, जि. सातारा) येथे ब्राह्मण कुटुंबात.
पित्याचे नाव : गणेश,
माता : सरस्वतीबाई
शिक्षण : प्राथमिक शिक्षण कराड येथे पूर्ण केले. • कराड येथे काही काळ मुन्सफ कोर्टात कारकूनी केली.
पुढील शिक्षणासाठी रत्नागिरी येथे गेले, परंतु गरीबी आड आल्याने पुन्हा कराडला परतून काही काळ कंपौंडरची नोकरी केली.
• १८७५ : मॅट्रिक परीक्षा अकोला येथून उत्तीर्ण.
१८७७ : उंब्रज येथील अंबुताई फडके यांच्याशी आगरकरांचा विवाह झाला.
१८७८ : डेक्कन कॉलेज, पुणे येथून बी. ए. उत्तीर्ण. यादरम्यान लोकमान्य टिळकांशी स्नेह जुळला.
१८८० : इतिहास व तत्त्वज्ञान हे विषय घेऊन एम. ए. उत्तीर्ण.
आगरकरांच्या शैक्षणिक सुधारणा :
१ जानेवारी १८८० : लो. टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या सहाय्याने आगरकरांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. ● आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली.
१८८४ पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत पुढाकार. या संस्थेच्या वतीने १८८५ मध्ये पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये आगरकर इतिहास व तर्कशास्त्र हे विषय शिकवत असत. १८९२ फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी आगरकरांची निवड, आगरकरांच्या आधी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य : वामन शिवराम आपटे
आगरकरांची विचारसरणी :
१) बुद्धिप्रामाण्यवाद : वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त अशा बुद्धिप्रामाण्याची स्थापना करण्याचा प्रयत्न आगरकरांनी केला. त्यानुसार, स्वतःच्या बुद्धिला पटेल ती गोष्ट दुसऱ्यांना पटली नाही तरी ती करणे आणि स्वतःच्या बुद्धिला न पटणारी गोष्ट जगाला मान्य असली तरी न करणे हा आगरकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद होता.
२) व्यक्तीस्वातंत्र्य : जन्मसिद्ध चातुर्वर्ण्य पद्धती आगरकरांना मान्य नव्हती. व्यक्तीसाठी समाज असतो, समाजासाठी व्यक्ती नव्हे हे आगरकरांचे तत्त्व होते.
समाजातील व्यक्तींचे परस्परांशी संबंध समतेच्या उदार तत्त्वावर अधिष्ठित झाले पाहिजे असे आगरकरांचे मत होते.
व्यक्तीच्या विकासासाठी विचार, व्यवसाय व विवाह यांचे स्वातंत्र्य हवे. आगरकरांनी व्यक्तीवादाला बुद्धिवाद व भौतिकवाद यांची जोड दिली.
३) मानवाचे ऐहिक सुखसंवर्धन : हे आगरकरांच्या समाजसुधारणेचे तिसरे मुलतत्त्व होते.
आगरकरांचा महिलांविषयक दृष्टिकोन
आगरकरांचा महिलांविषयक दृष्टिकोन : १८९१ साली बेहरामजी मलबारी यांची मूळ कल्पना असलेल्या संमती वय विधेयकाचे आगरकरांनी समर्थन केले व बालविवाहाच्या प्रथेस कडाडून विरोध केला.
स्वयंवर पद्धतीने विवाहास परवानगी असावी असे मत त्यांनी मांडले.
बालविवाहास विरोध करताना आगरकरांनी स्त्री-पुरुषांनी एकमेकांच्या पसंतीने विवाह करावेत, असा अभिप्राय दिला.
विकारविलसीत (शेक्सपियरच्या 'हॅम्लेट'चे मराठी भाषांतर) गुलामगिरीचे शस्त्र.
• वाक्यमीमांसा • केसरीतील निवडक निबंध वाक्याचे पृथक्करण सुधारकातील वाचक लेख
टिळक-आगरकर वाद :
टिळक व आगरकर यांच्यात आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा या मुद्द्यांवरून वितुष्ट आले. टिळकांना राजकीय सुधारणा अपेक्षित होत्या, तर आगरकरांनी तत्कालीन सामाजिक परिस्थिती विचारात घेऊन आपला सामाजिक सुधारणांचा मुद्दा रेटून धरला. यातूनच टिळक व आगरकर यांच्यात वितुष्ट आले.
आगरकरांची पत्रकारिता
आगरकरांची पत्रकारिता : १८८१ : लोकमान्य टिळकांनी 'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू केली.
१८८१-१८८७ या काळात केसरीचे पहिले संपादक म्हणून आगरकरांनी काम पाहिले.
• लोकमान्य टिळक हे 'मराठा' या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचे संपादक होते.
● १८८७ : लोकमान्य टिळकांशी वाद झाल्याने आगरकरांनी केसरीच्या संपादकत्वाचा राजीनामा दिला व
टिळक, डेक्कन एज्युकेशन संस्था याच्याशी फारकत घेतली. १८८८ : 'सुधारक' हे स्वतःचे साप्ताहिक मराठी व इंग्रजी या दोन्ही
भाषांत 'सुधारक' साप्ताहिकाच्या मराठी आवृत्तीचे संपादक गो. ग. आगरकर, सुरू केले.
'सुधारक' साप्ताहिकाच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक : गोपाळ कृष्ण गोखले. वऱ्हाड समाचार (अकोला) या पत्रात आगरकरांनी काही काळ लेख लिहिले.
आगरकरांचे प्रसिद्ध अग्रलेख
आगरकरांचे प्रसिद्ध अग्रलेख : 'इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार." "हिंदूस्थानचे राज्य कोणासाठी?' (या अग्रलेखात इंग्रजांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका केली. )
'स्त्रियांनी जाकीटे घातलीच पाहिजे'. (गुलामांचे राष्ट्र)
'सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे. आगरकरांवर प्रभाव टाकणारी व्यक्तीमत्त्वे : जॉन स्टुअर्ट मिल व हर्बर्ट स्पेन्सर
● इंदूरच्या महाराजांनी आगरकरांना दरमहा रु. १५०० मानधनाची देऊ केलेल नोकरी आगरकरांनी नाकारली.
१६ जुलै १८८२ कोल्हापूर संस्थानाचे दिवाण 'वासुदेव बर्वे (माधव बर्वे) प्रकरणाशी संबंध गोवून टिळक व आगरकर यांना १०१ दिवसांची डोंगरीच्या कारागृहाची सजा झाली. २६ ऑक्टोबर १८८२ रोजी सुटका.
पुण्यात जिवंतपणी स्वतःची प्रतिकात्मक प्रेतयात्रा पाहणारे आगरकर हे एकमेव समाजसुधारक.
गौरवोद्गार
गौरवोद्गार : वि. स. खांडेकर यांच्या मते आगरकर व चिपळूणकर हे मराठीतील दोन श्रेष्ठ निबंधकार आहेत.
निधन
निधन : १७ जून १८९५ रोजी आगरकरांचे दम्याच्या विकाराने वयाच्या ३९ व्या वर्षी पुणे येथे निधन. आगरकरांच्या पश्चात सीतारामपंत देवधर यांनी वासुदेव पटवर्धन यांच्या सहाय्याने 'सुधारक' चालविले.