आर्थिक नियोजन | Economical planinag

 आर्थिक नियोजन Economical planinag

  आज एक अतिशय महत्वाचा विषय मी आपणसमोर मांडणार आहे तो म्हणजे आर्थिक साक्षरता काळाची गरज. need of economic literacy . एक काळ असा होता की लोकांना शिक्षणाचे महत्त्व म्हणावे तितके कळले नव्हते  याचाच फायदा काही सुशिक्षित लोकानी उचलला व अनेक निरक्षर लोकांची फसवणूक केली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ५ मे १९८८ रोजी राष्ट्रीय साक्षरता मिशन कार्यक्रमाला सुरुवात केली. हेतू  हाच की १५ ते ३५ वयोगटातील साक्षर करणे त्यानं लिहिता वाचता येणे,आकडेमोड करता येणे. या योजनेचा फायदा असा की लोक जेवढे साक्षर तेवढे राष्ट्र उन्नतीला  योगदान देतील व त्यांची कोण फसवणूक करणार नाही असा दुहेरी फायदा होणार होता. 

आजचा विचार केला तर आज सर्वजण साक्षर आहेत पण आर्थिक साक्षर  किती आहेत ? याचे उत्तर विचार करायला लावणारे आहे. खूप शिकलेल्या  व्यक्तीला  कोणीतरी  बनावट फोन करून त्याच्या खात्यातील रक्कम लंपास करते. हे का झाले ? तर आर्थिक साक्षरतेचा अभाव .आपल्याकडे आहे तो पैसा,धन दौलत जतन करणे व तिच्यात वाढ करण्याचे कोणकोणते  मार्ग आहेत यांची जाणीव म्हणजे आर्थिक साक्षरता होय give information to income sourses is called economic literacy  उदाहरण द्यायचे झाले तर माझ्याजवळ पैसे आहेत मग मी त्याचे सोने खरेदी purches gold  करावयाचे ठरवले तर ते खरेदी करण्याची उचित वेळ कोणती ? मुहूर्त वगेरे मुद्दा आर्थिक साक्षरतेत येत नाही बरे. तर मी म्हणेन ज्यावेळेला जागतिक शेर  बाजार किंवा शेअर मार्केट sensex ,nifty  ढासळते त्यावेळी  सोन्याचे भाव gold price  गगनाला भिडतात आता तीच अवस्था आहे . मागील काही दिवसात सोने स्वस्त होते आज युद्धजन्य परिस्थिती म्हणून लोक safe investment म्हणून सोने खरेदी करत आहेत. थोडक्यात शेअर मार्केट तेजीत bulish असते त्यावेळी  सोने स्वस्त भेटते.  त्यावेळी गुंतवणूक करायला हरकत नही. आपल्या जवळील धनाचे योग्य नियोजन म्हणजेच आर्थिक नियोजन होय. 

समजा एखादी व्यक्ती नोकरदार आहे किंवा व्यापारी आहे त्याचा मासिक खर्च वगळता दरमहा त्याच्याजवळ २०००० उरत असतील तर त्याने त्या पैश्याचे  काय केले पाहिजे ?  यावर विचार करणे म्हणजे आर्थिक साक्षरता होय.  पारंपरिक विचार केला तर ती व्यक्ती  त्या पैशाची  दर सहा महिन्यांनी  fd म्हणजे fix deposit करत असेल . म्हणजेच ती  रक्कम मुदत ठेवीत ठेवून त्या बदल्यात बँकेकडून जो वार्षिक व्याजदर असतो त्यानुसार आपल्या  पैश्यावर  व्याज मिळवतात.इथे ही व्यक्ती  साक्षर आहे पण आर्थिक साक्षर आहे का तर पूर्ण आर्थिक साक्षर नाही हे वास्तव आहे. आपला पैसा कुठे कुठे गुंतवता येतो व तो वाढवता येतो याची जाणीव व त्यातील जोखमांची माहिती असणे याला आर्थिक साक्षरता म्हणतात. मग असे कोणते मार्ग आहेत जे माझा आहे तो पैसा केवळ वाढवतील असाच विचार नाही तर माझ्याकडील पैश्याला जतन करतील.  आर्थिक चणचण भासल्यास पैसा पण उपलब्ध करून देतील या सगळ्याची माहिती म्हणजे आर्थिक साक्षरता होय. 

आर्थिक साक्षरतेबाबत काही माहिती :

 १. आरोग्य विमा : mediclaim 

                        आज आपण पाहिले कोरोना  महामारी आली नि अनेक लोक दगावले.  ते सोडा पण यातून जे वाचले ज्याना दवाखाण्यात  भरती व्हावे लागले. ते आज जीवंत आहेत पण कित्येक लाखांचे कर्ज त्यांच्या  डोक्यावर आहे. हे का झाले ? तर आर्थिक साक्षरतेचा अभावच .समजा त्या परिवारांचे  आरोग्य विमा म्हणजेच mediclaim असते  तर त्यांचे लाखों रुपये वाचले असते. बरे mediclaim  साठी साधारणत  महिना हजार रुपये पुरेसे आहेत.  हे हजार रुपये लाखों रुपयांचे कवच आपल्याला देतात. 

२ . शासकीय बॉन्ड : goverment bond 

                              काही रकमेचे आपण शासकीय बॉन्ड खरेदी करू शकतो व त्याची किंमत  वाढल्यास पुन्हा विकू शिकतो यातून देखील आपण आपला पैसा वाढवू शकतो. 

३. शेअर मार्केट : stok market  

                       हा सामान्य माणसाला जरा अवघड वाटणारा व जास्त जोखीम असलेला भाग वाटतो  पण तसे काहीच नाही . एक गुंतवणूकदार म्हणून जर तुम्ही याकडे पहिले तर पैश्याने  पैसा कसा वाढवावा याचे सगळ्यात मोठे गुपित या शेअर मार्केट मध्ये आहे. आपल्याजवळील  नाममात्र रक्कम जर दरमहा आपण गुंतवत गेलो तर आपण करोडपतीही  बनू शकतो पण त्यासाठी थोडा अभ्यास हवा. यावर एक स्वतंत्र लेखमालिका नंतर येईल. तूर्तास शेअर मार्केट चे ज्ञान हा आर्थिक साक्षरतेचा भाग आहे हे ध्यानात घ्या. 

उदा. ५ वर्षापूर्वी तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या dmart कंपनीचा एक शेर तुम्ही घेतला असता  तर तो केवळ ७४३ रुपयांना  होता आज तो ४००० च्या घरात आहे. व मागील २ महिन्यापूर्वी तो ६००० च्या घरात होता.  असे अनेक स्टॉक म्हणजेच शेर आहेत याबबत सामान्य माणसाने माहिती मिळवायला हवीय.म्हणून सगळे पैसे शेर मध्ये गुंतवणे मूर्खपणा आहे असे मला तरी वाटते . याचे भान म्हणजेच तर आर्थिक साक्षरता.  

४. mutual fund : 

                           ज्यांना शेर मार्केट मधील कळत नाही त्यांना शेर मार्केट मधून पैसे मिळवून देण्यासाठी  हा  एक नामी मार्ग आहे तो म्हणजे म्यूचुअल फंड  यात आपण काही  रक्कम दरमहा sip स्वरूपात  एका फंड मॅनेजर ला देत असतो.  तो ती रक्कम अनेक कंपन्यांचा अभ्यास करून शेर मार्केट व इतर क्षेत्रात देखील गुंतवत असतो  व आपल्याला वार्षिक किमान २० ते २५ टक्के नफा मिळवून देत असतो. थोडक्यात काय तर थेंबे थेंबे  तळे साचे असे  आहे हे म्यूचुअल फंड चे गणित. 

५. पोस्ट योजना : post skim 

                          पोस्टाच्या अश्या अनेक योजना आहेत ज्यातून आपल्याला बँकेपेक्षा जास्त परतावा  मिळतो याची देखील महिती करून घ्यायला हवीय . 

 उदा. मुलींच्या शिक्षणासाठी सुकन्या समृद्धी योजना

६. प्रॉपर्टी विमा : property policy 

                    आपण एखादे घर लाखोंना  खरेदी  करतो. समजा कमावती व्यक्ती  या जगातून निघून गेली तर त्या घरावर ज्या  बँकेचे कर्ज आहे ती बँक ताबा घेते. त्यासाठी  प्रॉपर्टी घेताना काही रक्कम देऊन प्रॉपर्टी विमा घेतल्यास आपण बिनधास्त  राहू शकतो. 

७. टर्म इन्शुरंस : term insurance 

                    च्या माध्यमातुन समजा आपले काही बरे वाईट झाले तर माझे कुटुंब व त्याची  आर्थिक दृष्ट्या त्यांची वाताहत होणार नाही यासाठी किमान ५० लाखाचा का होईना टर्म प्लान आपल्याजवळ असणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर एलआयसी ची किमान एखादी पॉलिसी असावी . 

सुवर्ण बीसी योजना : gold bc 

                      हिच्या माध्यमातून दरमहा किमान एक ग्रॅमचे १० ते  ११ महीने याप्रमाणे आपण पैसे त्या सुवर्ण पेढीकडे  जमा करत गेलो तर बाराव्या महिन्यात या योजनेमार्फत आपल्याला वाढीव १ ग्राम सोने भेटू शकते इथे पैश्याची  बचत पण झाली सोन्याची खरेदी पण झाली असा दुहेरी फायदा आपल्याला मिळू शकतो . 


९. घर,जागा , जमीन व  गाळे यासारख्या  गुंतवणूका  :home ,plot ,flat  

      जर आपल्याजवळ बऱ्यापैकी पैसे असतील तर वरील गुंतवणुकीबाबत पण आपण विचार करू शकता मात्र कागदपत्रे  नीट माहिती करून घ्या. जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.


१० इतर मार्ग : other sources  npf , वेगवेगळ्या pension योजना यात देखील आपण गुंतवणूक करू शकतो.    

  अश्या अनेक बाबी आर्थिक साक्षरतेत येतात .मला ज्या  माहीती आहेत त्या तुम्हाला माझ्यापरीने सांगितल्या.अजून देखील आहेत पण त्यांच्या तपशिलात आपण जाणार नाही. केवळ आर्थिक भान हाच या लेखमागील हेतु आहे. काही महिन्यापूर्वी आपण पहिले फाटे कंपनीसारखे पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून  सुशिक्षित लोकांना  देखील  गंडा घालून गेले. सांगण्याचा मुद्दा  हा की आपल्याजवळ किती पैसा आहे हे महत्वाचे नाही तर तर तो पैसा तुम्ही कसा गुंतवता कुठे गुंतवता याला महत्व आहे . 

समजा मी गावी जात आहे रात्रीची वेळ आहे माझ्याजवळ पैसे आहेत अचानक चोर आले तर काय ? तर आपण काही रक्कम आपल्या  बॅगेत ठेवतो ,स्वताची गाडी असेल तर काही गाडीच्या डीकीत ठेवतो, काही रक्कम आपण बसलोय त्या शिट खाली ठेवतो. थोडक्यात आपण त्याचे छोटे छोटे कप्पे केले.  सोप्या भाषेत हिच  आहे आर्थिक साक्षरता . आपल्या जवळील  पैसा एकाच क्षेत्रात न गुंतवता अनेक क्षेत्रात त्यातील जोखीम लक्षात घेऊन गुंतवायला हवा. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.